सखी




जीवनाच्या क्षितिजावर

तों अनेक वेळा उगवेल

मानला तर सूर्य

नाहीतर नुसताच आगिचा गोळा।

असे बरेच काही तू बोलायचिस, तर्क वितर्क करत मी अर्थ लावित बसायचो.

रृतुंचे रंग लेउन एकेक वर्ष सर करताना किती अलगद इथवर पोहोचलिस तू
चांद्न्या गोंदुन अंगावर तू झेल्तेस आज चंद्र किरनाना.
आणि खट्याळ हसत चुचकारतेस सूर्य किरनाना.

असे बरेच काही तू करतेस, तर्क वितर्क करत मी अर्थ लावित बसतो.

फुलांचा गजरा केसात माळताना त्यांच्या सुकन्याची तमा तू कधीच केली नाहीस,
कारण सुगंध देऊन सुकनारे यथार्थ जीवन तू शिरसावान्द्य मानलेस
अनुभावाचे अनेक पाउस तुला ओलें चिम्ब करून गेले,
आणि त्यांची ओल तू मनात साठवलिस.
कोरडे होते अंग पण मन् नाही अस म्हनालीस.
रृतुंचे हिरवेपन जपलेस तू ,त्यामुळें कधी बेरंग होन्याचा तुला खेद वाटला नाही.

असे बरेच काही होत तुझें विश्व , तर्क वितर्क करत अजूनही उल्गड़तोय मी.






संदर्भ

बागडू द्या त्या बालकाला असेच नागडे
नसता तोही होईल माझयासारखा मानुसच ...

माखू दे अंग धुळिने,गीळु दया थोडीशी मातीही
मातिमोल जगात त्याला कोनी धुळ तर चारनार नाही ....

वाचू दया नजरेला त्याच्या आसपास
आम्ही आहोत की संदर्भ पानोपनी चाळायला...

पुन्हा...